Posts
Showing posts from August, 2024
- Get link
- X
- Other Apps
तळा येथे बेकायदा ऑनलाईन लॉटरी आणि चक्री जुगाराचा धुमाकूळ बस स्टँडच्या पाठीमागे समीर चा अवैध धंदा तळा पोलिसांना लाखोंचा हप्ता? पोलीस निरीक्षक सतिश श गवई यांचे दुर्लक्ष रायगड (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील तळा येथे पोलिसांच्याच हलगर्जीपणामुळे ऑनलाईन चक्री जुगार आणि लॉटरी च्या अवैध धंद्याने धुडगूस घातला आहे. तळा येथील बस स्टँडच्या पाठीमागे पहिल्याच गाळ्यामध्ये सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे या परिसरात अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. या अवैध धंद्यामुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आली आहे. तळा येथे हा अवैध धंदा राजरोसपणे सुरू आहे. यामुळे तरुण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात येथे चक्री जुगार खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्याच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तळा येथील या अवैध धंद्यांविरूद्ध सर्वसामान्य नागरिक व महिला वर्गात तळा पोलीसांच्या निष्क्रीयतेबद्दल संतापाची लाट पसरली आहे.
- Get link
- X
- Other Apps
तळा तालुक्यात बेकायदा गुटखा विक्री सुरू गुटखा माफीया पोलिसांना बोलतोय "बोलो जुबां केसरी?" मेकडे आणि दळाल नावाचे दोन गुटखा माफीया पोलीस निरीक्षक सतिश गवई यांचे दुर्लक्ष रायगड प्रतिनिधी) :- तळा तालुक्यात सध्या बेकायदेशीरपणे सुरू असलेली गुटखा विक्री हा सर्वत्र चर्चेचा विषय बनून राहिला असून या परिसरात 'दळाल आणि मेकडे'नावाच्या दोन गुटखा माफियांनी गुटखा विक्री चालू केलेली असून पोलिसांनी या प्रकाराकडे हप्ता घेऊन दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. येथील गुटखा माफीयांचे पोलिसांशी लागेबांधे असल्याचे स्पष्ट होत चालले आहे. गुटखा विकणारे अनेक टपरीवाले बोलतात की. आम्ही मेकडे आणि दळाल कडून गुटखा विक्रीसाठी घेतो. 'आमचे सगळीकडे हप्ते चालू असल्यामुळे मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही!'असे हे गुटखा माफिया ऐटीत सांगत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. या गुटखा माफियांनी गुटखा विक्रीसाठी अनेक एजंट नेमलेले असून ते एजंट संपूर्ण तळा परिसर, पान टपऱ्या, आणि दुकानांमध्ये गुटखा सप्लाय करण्याचे काम करू लागले आहेत. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या गुटका माफियावर तातडी...
- Get link
- X
- Other Apps
सामाजिक कार्यकर्ते श्री चैतन्य राजपुरकर यांचा उत्साहात वाढदिवस साजरा सुधागड (राकेश हुले) :- रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मा श्री राजपुरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुधागड तालुक्यातील घोडपापड आदिवासी वाडी येथील रा. जि. प. शाळा येथे आदिवासी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मा श्री सचिन सागळे साहेब तसेच राजपुरकर यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच अंगणवाडी शिक्षिका लता सुधीर खंडागळे, मदतनीस राणी घोघरकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला इंडुलकर, मंजुला गायकवाड, कमळी वाघमारे, व सुनीता पवार तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते