तळा येथे बेकायदा ऑनलाईन लॉटरी आणि चक्री जुगाराचा धुमाकूळ

बस स्टँडच्या पाठीमागे समीर चा अवैध धंदा

तळा पोलिसांना लाखोंचा हप्ता?

पोलीस निरीक्षक सतिश श गवई यांचे दुर्लक्ष

रायगड (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील तळा येथे पोलिसांच्याच हलगर्जीपणामुळे ऑनलाईन चक्री जुगार आणि लॉटरी च्या अवैध धंद्याने धुडगूस घातला आहे. 

तळा येथील बस स्टँडच्या पाठीमागे पहिल्याच गाळ्यामध्ये सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे या परिसरात अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. या अवैध धंद्यामुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आली आहे.

तळा येथे हा अवैध धंदा राजरोसपणे सुरू आहे. यामुळे तरुण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात येथे चक्री जुगार खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्याच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तळा येथील या अवैध धंद्यांविरूद्ध सर्वसामान्य नागरिक व महिला वर्गात तळा पोलीसांच्या निष्क्रीयतेबद्दल संतापाची लाट पसरली आहे.









Comments

Popular posts from this blog