सामाजिक कार्यकर्ते श्री चैतन्य राजपुरकर यांचा उत्साहात वाढदिवस साजरा
सुधागड (राकेश हुले) :- रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मा श्री राजपुरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुधागड तालुक्यातील घोडपापड आदिवासी वाडी येथील रा. जि. प. शाळा येथे आदिवासी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मा श्री सचिन सागळे साहेब तसेच राजपुरकर यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच अंगणवाडी शिक्षिका लता सुधीर खंडागळे, मदतनीस राणी घोघरकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला इंडुलकर, मंजुला गायकवाड, कमळी वाघमारे, व सुनीता पवार तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते
Comments
Post a Comment