तळा तालुक्यात बेकायदा गुटखा विक्री सुरू
गुटखा माफीया पोलिसांना बोलतोय "बोलो जुबां केसरी?"
मेकडे आणि दळाल नावाचे दोन गुटखा माफीया
पोलीस निरीक्षक सतिश गवई यांचे दुर्लक्ष
रायगड प्रतिनिधी) :- तळा तालुक्यात सध्या बेकायदेशीरपणे सुरू असलेली गुटखा विक्री हा सर्वत्र चर्चेचा विषय बनून राहिला असून या परिसरात 'दळाल आणि मेकडे'नावाच्या दोन गुटखा माफियांनी गुटखा विक्री चालू केलेली असून पोलिसांनी या प्रकाराकडे हप्ता घेऊन दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. येथील गुटखा माफीयांचे पोलिसांशी लागेबांधे असल्याचे स्पष्ट होत चालले आहे. गुटखा विकणारे अनेक टपरीवाले बोलतात की. आम्ही मेकडे आणि दळाल कडून गुटखा विक्रीसाठी घेतो. 'आमचे सगळीकडे हप्ते चालू असल्यामुळे मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही!'असे हे गुटखा माफिया ऐटीत सांगत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. या गुटखा माफियांनी गुटखा विक्रीसाठी अनेक एजंट नेमलेले असून ते एजंट संपूर्ण तळा परिसर, पान टपऱ्या, आणि दुकानांमध्ये गुटखा सप्लाय करण्याचे काम करू लागले आहेत. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या गुटका माफियावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून आणि महिला वर्गाकडून जोर धरू लागली आहे
Comments
Post a Comment