Posts

Showing posts from September, 2024
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
  कोलाड नाक्यावर रूग्णवाहिका बंद पडल्याने रिक्षाचालकांच्या मदतीमुळे गंभीर अवस्थेतील रूग्णाचे प्राण वाचले भाई सानप व त्यांच्या सहकाऱ्यांची कौतुकास्पद कामगिरी कोलाड (प्रतिनिधी) :-  रोहा तालुक्यातील कोलाड नाक्यावर रूग्णवाहिका बंद पडल्याने येथील रिक्षाचालक निलेश सानप उर्फ भाई सानप, विजय बागूल, विकास बागूल, संदीप खामकर, यांच्यासह रिक्षा-मिनीडोअर चालकांनी विशेष दक्षता घेऊन दाखविलेल्या प्रसंगावधानतेमुळे गंभीर अवस्थेतील रूग्णावर योग्य वेळी उपचार होऊन रूग्णाचे प्राण वाचले. 'माणूसकी हाच खरा धर्म आहे' हे येथील रिक्षा-मिनीडोअर चालकांनी आपल्या कार्यातून दाखवून दिल्याने त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. एक गंभीर अवस्थेतील रुग्ण रत्नागिरीहून मुंबईला घेऊन जात असताना रुग्णवाहिका कोलाड जवळ तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यातच बंद पडली. त्यावेळी रूग्णाच्या कुटूंबियांनी तात्काळ १०८ आपत्कालीन सेवेला फोन केला, परंतु त्यांच्याकडून कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे कळविण्यात आले. अत्यवस्थ रुग्णाला तातडीने मुंबईच्या रुग्णालयात पोहोचवणे आवश्यक होते. मात्र त्याच वेळी कोलाडमधील एका रिक...
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
  जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मेळाव्यांचे आयोजन रायगड (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील सर्व बेरोजगार उमेदवारांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे जिल्ह्यात विविध मेळावे घेण्यात येणार आहेत. या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उत्पादन क्षेत्रातील आस्थापनाची एकूण मनुष्य बळाच्या १०% व सेवा क्षेत्रातील आस्थापनाची एकूण मनुष्य बळाच्या २०% अशी रिक्तपदे अधिसूचित करण्यात येतील. त्याकरिता या मेळाव्यात विविध खाजगी आस्थापनाचा सहभाग असणार आहे. मेळाव्याचे विविध स्थळ व दिनांक पुढीलप्रमाणे  २३ सप्टेंबर वेळ १० ते १५ वा. रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पेण यांच्या मार्फत, विभागीय कार्यालय रामवाडी, पेण, २३ सप्टेंबर वेळ १० ते १५ वा.औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पेण यांच्या मार्फत शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज, रामवाडी पेण.२४ सप्टेंबर वेळ १० ते १५ वा.औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल यांच्या मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल.२५ सप्टेंबर वेळ १० ते १५ वा. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कर्जत यांच्या मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कर्जत. २६ सप्टेंबर वेळ १० ते १५ वा. जिल्...
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
  तळा कृषी अधिकारी कार्यालयातर्फे बेलघर येथे अटल बांबू लागवड योजनेबाबत मार्गदर्शन तळा : नजीर  पठाण :- तळा तालुक्यातील बेलघर येथे ग्रामस्थांच्या सभेचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय तळा मार्फत आयोजन करण्यात आले यावेळी उपस्थित ग्रामस्थांना महात्मा गांधी रोजगार हमी योजना, अटल बांबू लागवड योजना याबाबत मंडळ कृषी अधिकारी सारिका सावंत/ दिघे यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित सर्व ग्रामस्थांना फळबाग लागवड योजना, बांबू लागवड योजना याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. श्रीमती महानंदा नागुरे कृषी सहाय्यक बेलघर यांनी महाडीबीटी, ई पीक पाहणी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कृषी सहाय्यक अतुल बाबर, संदीप साळुंके उपस्थित होते.
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
  म्हसळा येथे अरुण, नरेशचा मटका, दोन फंटर म्हसळ्यात गल्लो गल्लीत चालवतात पोलीस निरीक्षक संदीप कहाले यांचे दुर्लक्ष  रायगड (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे पोलिसांच्याच हलगर्जीपणामुळे मटका जुगाराच्या अवैध धंद्याने धुडगूस घातला आहे.  म्हसळा येथे सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे या परिसरात अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. या अवैध धंद्यामुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आली आहे. म्हसळा येथे हा अवैध धंदा राजरोसपणे सुरू आहे. यामुळे तरुण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात येथे मटका जुगार खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्याच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. म्हसळा येथील या अवैध धंद्याविरूद्ध सर्वसामान्य नागरिक व महिला वर्गात म्हसळा पोलीसांच्या निष्क्रीयतेबद्दल संतापाची लाट पसरली आहे.
Image
  कपाशीवरील आकस्मिक मररोग नियंत्रणासाठी उपाययोजना अकोला (प्रतिनिधी) कापूस पिकावरील आकस्मिक मर रोगाच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने उपाययोजना सुचविल्या आहेत. सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी तथा मुसळधार पावसामुळे कपाशीवर आकस्मिक मर (पॅरा वील्ट) हा रोग दिसून येत आहे. साधारणतः आकस्मिक मर ही विकृती पीक फुलोरा अवस्थेत तसेच बोंडे परिपक्व झालेले असताना अधिक प्रमाणात दिसून येते. पावसाच्या मोठ्या खंडामुळे, कपाशी पि‍कास पावसाचा तान बसल्यास व त्यानंतर लगेच मोठ्या पावसामुळे निर्माण झालेले जमिनीतील आर्द्रता व साचलेले पाणी यामुळे आकस्मिक मर या विकृतीचा कापूस पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो.   आकस्मिक मर या विकृतीमुळे कापसाच्या झाडातील तेजपणा नाहीसा होऊन झाड एकदम मलूल तथा सुकल्यासारखे दिसते. तसेच त्यानंतर प्रादुर्भावग्रस्त कपाशीची सर्व पाने फुले खालच्या दिशेने वाकतात किंवा पिवळे पडतात. तसेच पात्या, फुले व अपरिपक्व बोंडे सुकून गळतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. रोगट झाडाची मूळे कुजत नाहीत. रोगग्रस्त झाडास हमखास नविन फूट येते. आकस्मिक मर: उपाययोजना : कापूस...
Image
 
Image
 
Image
 
Image
  मलनिस्सारण, स्वच्छता व पाणीपुरवठा आराखड्यात वाढत्या गरजा लक्षात घेऊन बदल आवश्यक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर महानगरातील विकास कामांना गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक नागपूर (प्रतिनिधी) :- वाढत्या नागपूर महानगरातील पायाभूत सुविधासमवेत पाणी पुरवठा, मलनिस्सारण व कचरा व्यवस्थापन आदी बाबत भविष्याचा विचार करुन आवश्यक तेथे आराखड्यात बदल करणे क्रमप्राप्त आहे. याबाबत विविध भागात नागरीकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा विचार करुन जो मास्टरप्लॅन तयार केला आहे त्यात आवश्यक तो बदल करुन कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  नागपूर महानगरातील मलनिस्सारण, स्वच्छता, नविन रस्ते, नविन वस्त्यांना पाणीपुरवठा याबाबत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ.नितीन राऊत, विधान परिषद सदस्य प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार विकास कुंभारे, आमदार...
Image
‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन रायगड (प्रतिनिधी) :- शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबा...
Image
  रायगड जिल्ह्यातील पायाभूत सेवा सुविधाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध  पालकमंत्री उदय सामंत कोलाड आणि वीर रेल्वेस्थानक परिसराचे सुशोभिकरण कामाचे लोकार्पण संपन्न रायगड (प्रतिनिधी) :- सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील कोलाड आणि वीर रेल्वेस्थानक परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या दोन्ही कामाचे लोकार्पण उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते  आज करण्यात आले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी  रायगड जिल्हा उदयोगाचे हब म्हणून विकसित असल्याचे सांगून रायगड जिल्ह्यातील पायाभूत सेवा सुविधाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचे सांगितले.  कोलाड आणि वीर रेल्वे स्थानक येथे आयोजित कार्यक्रमांस यावेळी खासदार सुनिल तटकरे, खासदार धैर्यशील पाटील,  आमदार भरत गोगावले, माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, प्रांताधिकारी श्री.ज्ञानेश्वर खुटवड,  कार्यकारी अभियंता महेश नामदे, कार्यकारी अभियंता, सा.बां.अलिबाग जगदिश सुखदेवे ...
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
  म्हसळा शहरांमध्ये अवैध त्यांचा धुमाकूळ, मटका जुगार राजरोसपणे सुरू  पोलीस निरीक्षक संदीप काहाले यांचे दुर्लक्ष अवैध धंदे चालक : नरेश, कुंभार आली साई मंदिर शेजारी तर अरुण याचा कुंभार आली, म्हसळा  रायगड : प्रतिनिधी  :- रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे मटका जुगार, सुरू असून येथील पोलीस अधिकारी संदीप काहाले यांनी येथील अवैध धंद्यांना अभय दिल्याचे दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या दृष्टीने पोलिसांची भूमिका महत्वपूर्ण असते. परंतु जर पोलीस अवैध धंद्यांना साथ देत असतील तर...? हा तर कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पोलीस दल"म्हणून लौकिक मिळविलेला आहे. पण काही "खादाड"वृत्तीच्या पोलिस अधिकाऱ्यांमुळे पोलीस दल नाहक बदनाम होत चालले आहे. म्हसळा येथे अशीच परिस्थिती असून येथील पोलिसांनी अवैध धंद्यांना साथ देऊन पोलीस दलाचे अब्रू वेशीवर टांगल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. येथे अवैध धंद्यांचा धांगडधिंगा सुरू असून पोलीस निरीक्षक संदीप काहाले यांना अवैध धंद्यांचा लाखो रुपयांचा हप्ता पोहोचत असल्यामुळे या अव...
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image