म्हसळा येथे अरुण, नरेशचा मटका, दोन फंटर म्हसळ्यात गल्लो गल्लीत चालवतात
पोलीस निरीक्षक संदीप कहाले यांचे दुर्लक्ष
रायगड (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे पोलिसांच्याच हलगर्जीपणामुळे मटका जुगाराच्या अवैध धंद्याने धुडगूस घातला आहे.
म्हसळा येथे सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे या परिसरात अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. या अवैध धंद्यामुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आली आहे.
म्हसळा येथे हा अवैध धंदा राजरोसपणे सुरू आहे. यामुळे तरुण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात येथे मटका जुगार खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्याच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. म्हसळा येथील या अवैध धंद्याविरूद्ध सर्वसामान्य नागरिक व महिला वर्गात म्हसळा पोलीसांच्या निष्क्रीयतेबद्दल संतापाची लाट पसरली आहे.
Comments
Post a Comment