तळा कृषी अधिकारी कार्यालयातर्फे बेलघर येथे अटल बांबू लागवड योजनेबाबत मार्गदर्शन
तळा : नजीर पठाण :- तळा तालुक्यातील बेलघर येथे ग्रामस्थांच्या सभेचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय तळा मार्फत आयोजन करण्यात आले यावेळी उपस्थित ग्रामस्थांना महात्मा गांधी रोजगार हमी योजना, अटल बांबू लागवड योजना याबाबत मंडळ कृषी अधिकारी सारिका सावंत/ दिघे यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित सर्व ग्रामस्थांना फळबाग लागवड योजना, बांबू लागवड योजना याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. श्रीमती महानंदा नागुरे कृषी सहाय्यक बेलघर यांनी महाडीबीटी, ई पीक पाहणी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कृषी सहाय्यक अतुल बाबर, संदीप साळुंके उपस्थित होते.
Comments
Post a Comment