जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मेळाव्यांचे आयोजन

रायगड (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील सर्व बेरोजगार उमेदवारांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे जिल्ह्यात विविध मेळावे घेण्यात येणार आहेत. या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उत्पादन क्षेत्रातील आस्थापनाची एकूण मनुष्य बळाच्या १०% व सेवा क्षेत्रातील आस्थापनाची एकूण मनुष्य बळाच्या २०% अशी रिक्तपदे अधिसूचित करण्यात येतील. त्याकरिता या मेळाव्यात विविध खाजगी आस्थापनाचा सहभाग असणार आहे.

मेळाव्याचे विविध स्थळ व दिनांक पुढीलप्रमाणे 

२३ सप्टेंबर वेळ १० ते १५ वा. रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पेण यांच्या मार्फत, विभागीय कार्यालय रामवाडी, पेण,

२३ सप्टेंबर वेळ १० ते १५ वा.औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पेण यांच्या मार्फत शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज, रामवाडी पेण.२४ सप्टेंबर वेळ १० ते १५ वा.औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल यांच्या मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल.२५ सप्टेंबर वेळ १० ते १५ वा.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कर्जत यांच्या मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कर्जत. २६ सप्टेंबर वेळ १० ते १५ वा.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड- अलिबाग, व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अलिबाग आणि जे एस एम कॉलेज, अलिबाग यांच्या मार्फत जे. एस. एम. कॉलेज, अलिबाग.२६ सप्टेंबर वेळ १० ते १५ वा.औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड यांच्या मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड.

२७ सप्टेंबर वेळ १० ते १५ वा.औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उरण यांच्या मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उरण. ३० सप्टेंबर वेळ १० ते १५ वा.औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागोठणे यांच्या मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागोठणे.

या मेळाव्यामध्ये उमेदवाराची निवड केलेल्या आस्थापनामध्ये ६ महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम करावे लागणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना कौशल्य विकास विभागामार्फत DBT द्वारे शैक्षणिक पात्रता (बारावी उतीर्ण ६,०००/- रु, आय टी आय/पदविका उतीर्ण ८,०००/- रु, पदवी उत्तीर्ण १०,०००/- रु) या प्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल. 

या विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दीतीने अर्ज करता येईल. तरी या मेळाव्याचा जास्तीत-जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन  सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग श्रीम.अ.मु. पवार यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog