कर्जत येथील हत्याकांडातील दोन आरोपींना अटक रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कामगिरी कर्जत : पंकेश जाधव :- कर्जत येथील हत्याकांडातील दोन आरोपींना अटक करण्याची धडक कामगिरी रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे. कर्जत कडून मुरबाडकडे जाणाऱ्या रोडवर कशेळे गावच्या पुढे अबासा फार्म हाउस पासून काही अंतरावर जंगल असलेल्या निर्जळस्थळी रोडच्या बाजूला एक 25 ते 27 वर्षे वयाचा अनोळखी इसमाने दोन्ही हात पाठीमागे व दोन्ही पाय बांधून गळा कापून निर्घुण खून केल्याच्या अवस्थेत रोडच्या बाजूला पडल्याची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग श्री. धुळा टेळे यांनी भेट देवून शहानिशा केली त्यानंतर खबर देणारे इसम नामे श्री. महादेव संभाजी म्हसे यांची प्रथम खबरी फिर्याद घेवून कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.57/2024 भा.दं.वि.क.302 अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व स्थानिक गुन्हे श...
Comments
Post a Comment