कोलाड शहरातील खांब नाक्यावर अवैध विमल, रजनीगंधा, आर एम डी, विक्री राजरोसपणे सुरू, गुटखा विक्रीचे राजनाथ आणि सुरज फोडतायत फटाके,
कोलाड आणि खांब येथील अवैध धंदे पोलिसांना दिसत नाही का ?कर्मचारी झोपा काढतात का? सर्वत्र गर्दीमुळे होतोय आचारसंहितेचा भंग
कोलाड शहरातील आजूबाजूंच्या गावांमध्ये गावठी हातभट्टीची दारूचा धंदा राजरोसपणे सुरू,
पानटपरी वाले बोलतात, आठ दिवसांनी गुटखा टपरीवर आला आहे, मग येथील पोलीस कर्मचारी काय करतात? अवैध धंदे दिसत नाहीत का?
रायगड : प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे आजूबाजूच्या गावांमध्ये आणि आदिवासी वाड्यांमध्ये बेकायदा गावठी हातभट्टीची दारू विक्री सुरू असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. तसेच कोलाड शहरात 'टिपू आणि ठाकूर' नावाच्या दोन गुटखा माफीयांनी गुटखा विक्री चालू केलेली असून पोलिसांनी या प्रकाराकडे हप्ता घेऊन दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. तसेच कोलाड मध्ये आजूबाजूच्या टप्प्यांवर, दुकानांवर खुलेआम गुटखा विक्री सुरू असून पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच येथील पोलीस अधिकारी नितीन मोहिते यांनी येथील अवैध धंद्यांना अभय दिल्याचे दिसून येत आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या दृष्टीने पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. परंतु जर पोलीस अवैध धंद्यांना साथ देत असतील तर...? हा तर कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पोलीस दल'म्हणून लौकिक मिळविलेला आहे. पण काही "खादाड" वृत्तीच्या पोलीस अधिकाऱ्यांमुळे पोलीस दल नाहक बदनाम होत चालले आहे. कोलाड येथे अशीच परिस्थिती पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. येथे अवैध धंद्यांचा धांगडधिंगा सुरू असून पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांना अवैध धंद्यांचा लाखो रुपयांचा हप्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्यांवर पोलीस कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे.
या अवैध धंद्यांकडून दर महिन्याला कोलाड पोलिसांना लाखो रुपयांचा हप्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्याविरुद्ध पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. या परिसरात कायदा सुव्यवस्था ढासण्याची चिन्हे दिसू लागली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तरुण आणि वयोवृद्ध माणसे व्यसनाच्या आहारात जात असून येथे मोठ्या अवैध धंद्यांच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या बेकायदा गावठी हातभट्टी ची दारू आणि गुटखा विक्रेत्यान मुले महिला वर्गातून देखील नाराजीचा सूर उंमटू लागला आहे. येथे अवैध धंदे जोमाने सुरू आहेत. पण तरीही येथील पोलीस गप्प का? या प्रश्नामुळे या परिसरात पोलिसांच्या कार्यपद्धतीचे धिंडवडे निघू लागले आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि रायगड पोलीस अधीक्षक यांनी तातडीने या गंभीर समस्येची दखल घेऊन येथील गावठी हातभट्टीचे धंदे, गुटखा विक्री, करणाऱ्यावर कारवाई करावी आणि या अवैध धंद्यांना साथ देणारे पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे कारण पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्यावर कारवाई झाली तरच येथील अवैध धंदे बंद होतील असे दिसून येत आहे.
Comments
Post a Comment