"112 आपत्कालीन नंबर" ला कोलाड पोलिसांनी फाट्यावर मारले, बेकायदा मटका तात्पुरता बंद ठेवून पुन्हा सुरू केला!
बेकायदा मटक्यामुळे कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा - सुव्यवस्थेचे वाजले तीन तेरा!
यशवंत आपारमेंट मध्ये "भगत"चा मटका राजरोसपणे सुरू
पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांना लाखोंचा हप्ता?
कोलाड पोलीस बनलेत मटका व्यावसायिकांच्या ताटाखालचे मांजर?
रायगड : प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे मटका जुगार, सुरू असून येथील पोलीस अधिकारी नितीन मोहिते यांनी येथील अवैध धंद्यांना अभय दिल्याचे दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या दृष्टीने पोलिसांची भूमिका महत्वपूर्ण असते. परंतु जर पोलीस अवैध धंद्यांना साथ देत असतील तर...? हा तर कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पोलीस दल"म्हणून लौकिक मिळविलेला आहे. पण काही "खादाड"वृत्तीच्या पोलिस अधिकाऱ्यांमुळे पोलीस दल नाहक बदनाम होत चालले आहे. म्हसळा येथे अशीच परिस्थिती असून येथील पोलिसांनी अवैध धंद्यांना साथ देऊन पोलीस दलाचे अब्रू वेशीवर टांगल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
खास वसुली एजंट "शिद" याने तर कहर केलाय
येथे अवैध धंद्यांचा धांगडधिंगा सुरू असून पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांना अवैध धंद्यांचा लाखो रुपयांचा हप्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्यांवर पोलीस कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. पोलीस कर्मचारी झोपा काढतात का? अवैध धंदे दिसत नाही का, या अवैध धंद्याकडून दर महिन्याला कोलाड पोलिसांना लाखो रुपयांचा हप्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्यानविरुद्ध पोलीस पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. या परिसरात कायदा सुव्यवस्था ढासळण्याची चिन्हे दिसू लागली असून अनेकांचे संस्कार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तरुण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात मटका जुगार, खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्यांच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या बेकायदा मटका जुगारामुळे महिला वर्गातून देखील नाराजीचा सूर उमटू लागला आहे. येथे अवैध धंदे जोमाने सुरू आहेत. पण तरीही येथील पोलीस गप्प का? या प्रश्नामुळे या परिसरात पोलिसांच्या कार्यपद्धतीचे धिंडवडे निघू लागले आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि रायगड पोलीस अधीक्षक यांनी तातडीने या गंभीर समस्येची दखल घेऊन येतील मटका क्लब जुगाराविरुद्ध कारवाई करावी आणि या अवैध धंद्यांना साथ देणारे पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे कारण पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्यावर कारवाई झाली तरच येथील अवैध धंदे बंद होतील असे दिसून येत आहे.
Comments
Post a Comment