
"डॉ.सी.डी.देशमुख महाविद्यालयात जिल्हा स्तरीय नेतृत्व गुण विकास शिबीर संपन्न." रोहा : निलेश पाटणकर :- मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या मार्गदर्शक तत्त्वांनाअनुसरुन मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व कोकण एज्युकेशन सोसायटीचे डॉ.चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ.कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालय रोहा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय जिल्हा स्तरीय नेतृत्व गुण विकास शिबीर संपन्न झाले. सदर शिबिरात रायगड जिल्ह्यातील एल.एस .पी. एम.चोंढी महाविद्यालय,जे.एन. पालीवाल महाविद्यालय पाली, एम. बी. मोरे महिला महाविद्यालय धाटाव,सी. के. ठाकूर महाविद्यालय पनवेल,डी. जी. तटकरे महाविद्यालय माणगाव, एस. एम. डी. एल. महाविद्यालय कळंबोली, डॉ. पतंगराव महाविद्यालय पेण, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्रीवर्धन, दोशी वकील महाविद्यालय गोरेगांव, कोकण एज्युकेशन सोसायटीचे डॉ.चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ कुसुमताई ताम्हणे कला महाविद्यालय रोहा, वसंतराव नाईक महाविद्यालय म्हसळा,महात्मा फुले कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पनवेल, पिल...