सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावीने कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वितरण
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन
पुणे : प्रतिनिधी :- सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयाच्यावतीने विश्वेश्वरय्या हॉल येथे आयोजित रस्ते सुरक्षा अभियान व जागृती कार्यक्रमाच्यावेळी मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या हस्ते विभागातील १५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात हेल्मेटचे वितरण करण्यात आले.
यावेळी पुणे मंडळाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, सातारा मंडळाचे एस. बी. रोकडे, कोल्हापूर मंडळाचे टी.ए. बुरुड, सोलापूर मंडळाचे एस.एस. माळी आदी उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले, या कार्यक्रमाच्या माध्यमातून हेल्मेट वापरण्याबाबत जागृती करण्यासोबतच प्रत्यक्षात हेल्मेट घालण्यास प्रवृत्त करण्याचा उद्देश आहे. हा उद्देश सफल करण्याकरीता हेल्मेट वितरणाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली. सार्वजनिक बांधकाम मंडळामार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकूण ५०० हेल्मेटचे वितरण करण्यात येणार आहे. रस्ते सुरक्षा अभियान व जागृतीबाबतची संकल्पना पुणे प्रादेशिक विभागातील सातारा, कोल्हापूर व सोलापूर मंडळानेही याप्रमाणे कार्यवाही करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरण्याबाबत श्री. चव्हाण यांनी आवाहन केले.
Comments
Post a Comment