"डॉ.सी.डी.देशमुख महाविद्यालयात जिल्हा स्तरीय नेतृत्व गुण विकास शिबीर संपन्न."
रोहा : निलेश पाटणकर :- मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या मार्गदर्शक तत्त्वांनाअनुसरुन मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व कोकण एज्युकेशन सोसायटीचे डॉ.चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ.कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालय रोहा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय जिल्हा स्तरीय नेतृत्व गुण विकास शिबीर संपन्न झाले. सदर शिबिरात रायगड जिल्ह्यातील एल.एस .पी. एम.चोंढी महाविद्यालय,जे.एन. पालीवाल महाविद्यालय पाली, एम. बी. मोरे महिला महाविद्यालय धाटाव,सी. के. ठाकूर महाविद्यालय पनवेल,डी. जी. तटकरे महाविद्यालय माणगाव, एस. एम. डी. एल. महाविद्यालय कळंबोली, डॉ. पतंगराव महाविद्यालय पेण, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्रीवर्धन, दोशी वकील महाविद्यालय गोरेगांव, कोकण एज्युकेशन सोसायटीचे डॉ.चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ कुसुमताई ताम्हणे कला महाविद्यालय रोहा, वसंतराव नाईक महाविद्यालय म्हसळा,महात्मा फुले कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पनवेल, पिलाई इंजिनिअरिंग महाविद्यालय पनवेल,कोकण एज्युकेशन सोसायटीचे आनंदीबाई प्रधान महाविद्यालय नागोठणे, कोकण ज्ञानपीठ संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कर्जत, वसंतराव नाईक महाविद्यालय मुरूड, जे. एस.एम.महाविद्यालय अलिबाग,
कोकण एज्युकेशन सोसायटीचे लक्ष्मी-शलीनी महिला महाविद्यालय पेझारी, अंजुमन इस्लाम डिग्री महाविद्यालय मुरूड,भाऊसाहेब नेने महाविद्यालय पेण, हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट संचलित महाविद्यालय महाड, टी. एम. सी.महाविद्यालय माणगाव, बार्न्स महाविद्यालय पनवेल, कोकण ज्ञानपीठ इंजिनिअरिंग महाविद्यालय कर्जत,सुंदरराव मोरे महाविद्यालय पोलादपूर,विर वाजेकर महाविद्यालय उरण, कोकण ज्ञानपीठ संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय उरण, प्रभाकर पाटील एज्युकेशन संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वेश्र्वी, जी. एम. वेदक विज्ञान महाविद्यालय तळा, डी. जी. तटकरे महाविद्यालय तळा, पीलाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रसायनी या महाविद्यालयातील निवडक ७२ विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.
या जिल्हा स्तरीय नेतृत्व गुण विकास शिबीराचा मुख्य उद्देश सहभागी विद्यार्थ्याना राष्ट्रीय सेवा योजनेचे पुर्ण ज्ञान देणे, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसीत करणे व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे हा होता.
या जिल्हा स्तरीय नेतृत्व गुण विकास शिबीराचे उद्घाटन कोकण एज्युकेशन सोसायटीचे जेष्ठ संचालक ऍड. हेमंत गांगल यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाले. या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांनी भूषविले. उद्घटन प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे रायगड जिल्हा समन्वयक प्रा. तुळशिदास मोकल,प्रा.अनंत थोरात व प्रा. सुकुमार पाटील उपस्थीत होते. या जिल्हा स्तरीय नेतृत्व गुण विकास शिबीरात राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश, ध्येय व इतिहास, राष्ट्रीय सेवा योजनेचे नियमित व निवासी उपक्रम, संवाद कौशल्य, सामुदायिक कार्यातील सामजिक समस्या, राष्ट्रीय सेवा योजना व्यवस्थापन व संधी, व्यक्तिमत्व विकास, ग्रामीण विकासातील युवकांची भूमिका, कौशल्य विकास प्रशिक्षण, वेळेचे व्यवस्थापन, अहवाल लेखन व संपादन कौशल्य आदी विषयावर प्रबोधन सत्र झाली.
या जिल्हा स्तरीय नेतृत्व गुण विकास शिबीरात सहाभगी विद्यार्थ्यांसाठी चर्चा सत्र, निबंध स्पर्धा, भितीपत्रक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या सर्वच स्पर्धांमध्ये सर्व विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. या जिल्हा स्तरीय नेतृत्व गुण विकास शिबीराचा समारोप महाविद्यालय विकास समितीचे सदस्य लिलाधर थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत व या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. समारोप प्रसंगी सहभागी विद्यार्थ्याना सहभाग प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
या जिल्हा स्तरीय नेतृत्व गुण विकास शिबीरासाठी मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे विशेष कार्य अधिकारी प्रा.सुशील शिंदे, तसेच मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.रमेश देवकर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. हे जिल्हा स्तरीय नेतृत्व गुण विकास शिबीर यशस्वी करण्यासाठी जिल्हा समन्वयक प्रा. तुळशिदास मोकल, विभागीय समन्वयक, रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व कार्यक्रमअधिकारी, या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांनी अखंड मेहनत घेतली.
Comments
Post a Comment