सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सोसायटीमार्फत
कंत्राटी पद्धतीने पदभरती
रायगड : प्रतिनिधी :- बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने रु.३/- लाख पर्यंत इतक्या रक्कमेची कामे विनानिविदा उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभाग जिल्हा स्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यांत आली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये खालील नमुद कंत्राटी कामे सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सोसायटी मार्फत कंत्राटी पध्दतीने भरावयाची पदभरती पुढीलप्रमाणे-
कार्यालयाचे नांव,कंत्राटी सेवेचे नांव,कामाचे ठिकाण, व कामाचा कालावधी
०१) जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग (खनिकर्म शाखा) लिपिक, पदसंख्या-०१ व शिपाईकम वाहनचालक-०१ अलिबाग-रायगड, कालावधी-११ महिने,
०२) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग-शिपाई पदसंख्या-०१, अलिबाग-रायगड
तसेच अ.क्र.०२ येथील कार्यालयाकरीता बेरोजगारांच्या सेवा सोसायटी मार्फत कंत्राटी सेवेकरीता पदवीधर अंशकालीन उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
तरी ज्या सेवा सोसायटयांचे कार्यक्षेत्र अलिबाग तालुक्याकरिता आहे अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास उपरोक्त कंत्राटी काम मिळणेबाबतचे आपले प्रस्ताव दिनांक १६/१२/२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग या कार्यालयात स्वहस्ते सादर करावे. आवश्यक अटी व शर्तीची पुर्तता करणे अनिवार्य आहे. उशिरा प्राप्त झालेले तसेच अपुर्ण स्वरूपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी, अधिक माहितीस्तव या कार्यालयास प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक ०२१४१-२२२०२९ वर संपर्क साधावा.
असे आवाहन सहायक आयुक्त, श्रीम. अ.मु.पवार, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांनी केलेले आहे.
Comments
Post a Comment