रोहा तालुक्यातील इंदरदेव धनगरवाडीत आगडोंब, 

वणव्यात 48 घरे, ढोरांच्या गवतगंज्या आणि गुरांचे गोठे जळून खाक. 

सुदैवाने जीवितहानी नाही.

रोहा : प्रतिनिधी :- रोहा तालुक्यातील इंदरदेव धनगरवाडी येथे वणव्याने आगडोंब उसळला, आगीत 48 घरे, ढोरांच्या गवतगंज्या आणि अनेक गुरांचे गोठे जळून खाक झाले.

गुरुवारी दि ६ रोजी दुपारी लागलेल्या वणव्यात गावातील शेतकऱ्यांची 48घरे, गवतगंज्या व गुरांचे गोठे जळून राख झाले. संपूर्ण धनगर वाडी परिसराला या वणव्याने वेढले होते. यातील सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली झाडेही आगीच्या भक्षस्थानी पडली. भिषण आग पाहून अनेकांना भोवळ आली. त्यांना ताबडतोब रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही.

रोहा तालुक्यातील दुर्गम डोंगरावर वसलेल्या इंदरदेव धनगर वाडी परिसरात ही आग आग लागली. थोड्याच वेळात याचे रूपांतर मोठ्या वणव्यात झाले. रात्री उशिरापर्यंत वणवा धुमसत होता. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वणवा विझवण्यासाठी पराकाष्ठा केली. दुर्गम डोंगराळ भागात धनगर वाडी असल्याने मदत पोहोचण्यास विलंब होत होता. धनगरवाडीत आगडोंब उसळल्याचे समजताच तात्काळ प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी तिकडे धाव घेतली. ग्रामस्थ आणि वनखात्याचे वनपाल हंबीर वणवा विझवण्यासाठी झटत होते. सद्या इंदरदेव धनगर वाडीतील ग्रामस्थांनी डोंगराखालील धामणसई गावात आश्रय घेतला आहे. भेदरलेले आणि सर्वस्व गमावलेले पिडीत नागरिक प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.

Comments

Popular posts from this blog