नागोठणेनजीक लॉजींगमध्ये चालतोय भलताच धांगडधिंगा? तातडीने कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
रायगड प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात हायवेनजीकच एका लॉजींगमधील एकूण १६ रूम्स मध्ये भलताच धांगडधिंगा सुरू असून १६ ते २५ वयोगटातील मुली/महिला येथे तोंड झाकून ये-जा करीत असल्यामुळे येथे लॉजींगच्या नावाखाली काहीतरी अनैतिक प्रकार सुरू असल्याची एकच चर्चा या परिसरात होताना दिसत आहे. येथील लॉजींग हॉटेल चालविणाऱ्यांबरोबरच हॉटेलच्या मालकांविरूद्ध कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
बाहेरून 'कॉलगर्ल' मागवून त्यांना प्रवासी म्हणून दाखवणे आणि "धंदा" करून घेणे, असाच उद्योग या लॉजिंग व्यावसायिकांनी चालविला आहे. हाफ सर्विस आणि फुल्ल सर्विस घेण्यासाठी येथे आंबटशौकीनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु असल्याचे दिसून येत आहे. शासनाने लॉजिंग चालविण्यासाठी कडक नियम घालून दिले. लॉजचा वापर करणाऱ्या प्रवाशांकडून ओळखपत्र घेणे सक्तीचे आहे. लॉजचा वापर कोणत्या कारणासाठी होणार आहे, याचाही उल्लेख रजिस्टरमध्ये आवश्यक असतो. परंतु असे कोणतेही नियम लॉजिंग व्यावसायिकांकडून पाळले जात नाही. येथे अशा प्रकारचे अनैतिक धंदे सुरू असताना देखील या लॉजींग हॉटेल्सवर कारवाई का होत नाही? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
Comments
Post a Comment