रोहा मधील खालचा मोहल्ला येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रायगड : सचिन सागळे :-  रोहा येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.रोहा येथील खालचा मोहल्ला, सिद्धार्थ नगर येथील अल्पवयीन मुलीचा विनय भंग केल्याची घटना काल दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली, मिळालेल्या माहितीनुसार, रेशनकार्ड ला आधार कार्ड लिंक करतो असे सांगून सुलतान दाऊद पानसरे (रा. खालचा मोहल्ला, रोहा) याने मोबाईलमधून अश्लील व्हिडिओ दाखवून विनयभंग केल्याची घटना घडली. त्यानंतर याबाबद जाब विचारण्यास गेलेल्या फिर्यादींना " तुमको जो उखाना है उखाड लो" अशा शब्दात धमकी दिली. 

याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५(१), ७९, ३५१ (२) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रोहा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. पायक करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog