रेनबो प्री प्रायमरी स्कूल विंधणे येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न 

उरण : विठ्ठल ममताबादे :- स्वर्गीय पदूबाई महादेव जोशी सोशल अँड एज्युकेशनल सोसायटी टाकीगांव ट्रस्ट अंतर्गत स्थापन झालेल्या रेनबो प्री प्रायमरी स्कूल विंधणे येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाला.संस्थापक/अध्यक्ष  मंगेश दामोदर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्नेह संमेलन मोठया उत्साहात संपन्न झाले.दिनांक १६/३/२०२५ रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची थीम 'तरंग' अशी होती.या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहात मोठया प्रमाणात सहभाग घेतला.अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात, उत्साहात हा उपक्रम संपन्न झाला.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अरुण नाईक -समाजसेवक टाकीगाव,श्रावण नाईक -समाजसेवक टाकीगाव,

गोपाळ जोशी-माजी सरपंच विंधणे,अस्विथ थळी -समाजसेवक विंधणे,मधुकर नवाले - समाजसेवक विंधणे,

क्रांती जोशी-माजी सरपंच विंधणे ,सूरज म्हात्रे-समाजसेवक टाकीगांव,बळीराम नवाले-माजी उपसरपंच विंधणे,जयवंत पाटील-माजी सरपंच विंधणे,शशिकांत पाटील -समाजसेवक विंधणे,संजय ठाकूर -समाजसेवक नवपाडा,रोहित नाईक-उप सरपंच विंधणे ,सिकंदर जोशी ,अर्जुन नाईक ,सुनील नाईक ,शरद म्हात्रे,सुधाकर नाईक,राजेश कोळी,गणेश जोशी,संदीप पाटील,मनोहर चिरलेकर,रूपेश ठाकूर(अडव्होकेट),जीवन डाकी,ऋषिकेश पाटील आदी मान्यवर तसेच पालक मोठया प्रमाणात उपस्थित होते. सदर उपक्रमाचे मान्यवरांनी, पालकांनी विशेष कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog