नागोठणे विभागातील असंख्य कार्यकर्ते व मुस्लिम बांधवांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
रायगड : प्रतिनिधी :- नागोठणे विभाग तसेच नागोठणे येथील मुस्लिम मोहल्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे रोहा तालुका पक्षप्रमुख ऍड.श्री. मनोज कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला.
पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना पक्षाचे नेते कॅबिनेट मंत्री मा. श्री. नाम . भरत गोगावले रोजगार हमी व फलउत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसालकर शिवसेना तालुका प्रमुख रोहा ऍड.मनोज कुमार शिंदे, शिवसेना उपतालुका प्रमुख रोहा मनोज खांडेकर,शिवसेना विभाग प्रमुख नागोठणे प्रवीण ताडकर, शिवसेना उपविभाग प्रमुख आकाश मढवी शिवसेना शहरप्रमुख संतोष चितळकर उपस्थित होते.
पक्ष प्रवेश सोहळ्यात शिवसेनेमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते नसिम अधिकारी, भाजपाचे रोहा तालुका अल्पसंख्याक समाज माजी अध्यक्ष सौ. फातिमा सलाम सय्यद, काँग्रेसचे अल्पसंख्याक रोहा तालुका माजी अध्यक्ष तथा पत्रकार याकुब सय्यद, काँग्रेस पक्षाचे युवा शहर अध्यक्ष फैयाज अ. रहेमान पानसरे, काँग्रेसचे कार्यकर्ते अजीम अहमद मुल्ला, आर पी आय पक्षाचे रोहा तालुका अध्यक्ष असगर शब्बीर सय्यद, काँग्रेस युवा कार्यकर्ते श्री. दानिश अधिकारी, काँग्रेस महिला युवा शहराध्यक्ष सौ. अफ्रिन दानिश अधिकारी, सज्जाद पानसरे, अजीम कुवारे, सादिक सय्यद, मुदस्सर पोत्रिक, हनीफ पठाण,समीर सय्यद, मुस्ताक सय्यद, फाहीक पानसरे, शहेबाज सय्यद, रुशान पानसरे, मोजम कोरतकर, शम्मी पानसरे, मारूफ कोरतकर, वसीम कडवेकर, मंजर पठाण यांनी भरत गोगावले यांच्या शुभ हस्ते शिवसेना प्रवेश केला.
नागोठणे शहरामध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित शुद्धीकरण पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला नसून अनेक वेळा राष्ट्रवादी तसेच शिवसेनेचे नेत्यांनी या गावकऱ्यांना शुद्ध पाणी देण्याचा आश्वासन दिला आहे. परंतु आज पर्यंत लोकांच्या मुखाला शुद्ध पाणी मिळालं नाही हे दुर्दैव आहे. परंतु आज नागोठणे मुस्लिम बांधवांनी मोहल्यामध्ये शिवसेना पक्षात प्रवेश केला. पक्षावर विश्वास टाकला आहे. त्या विश्वासाला कदापी मी तडा जाऊ देणार नाही. लवकरात लवकर तमाम नागोठणेकरांना शुद्ध पाणी पाजण्याचे मी या ठिकाणी वचन देतो. तसेच नागोठणे गावातील अनेक विकासात्मक काम खुंटले आहेत, ते सर्व विकासात्मक काम मी यापुढे पूर्ण करीन. असे सर्व कार्यकर्त्यांसमोर भरत गोगावले रोजगार व हमी फलोत्पादन कॅबिनेट मंत्री यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मोहल्यातील सामाजिक कार्यकर्ते याकूब सय्यद व त्यांच्या बरोबर शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या गावातील विकासात्मक कामांकरिता, मी त्यांच्या सदैव पाठीशी ठामपणे उभा आहे.
शिवसेना रोहा तालुकाप्रमुख ऍड.मनोज कुमार शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये असे सांगितले की, शिवसेना पक्षाचे नेते मंडळींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नागोठणे विभाग तसेच नागोठणे मोहल्यातील मुस्लिम बांधवांनी निस्वार्थपणे पक्षावर विश्वास दर्शवित पक्ष प्रवेश केला आहे. त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहून, त्या कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेऊन, त्यांच्या अडचणी दूर करण्याचे खऱ्या अर्थाने काम मी करेन असे सर्व कार्यकर्त्यांसमोर सांगितले.
नागोठणे येथील पत्रकार राज वैशंपायन आपले मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते याकूब सय्यद यांचे वडील पै.सत्तार भाई सय्यद व त्यांचे मोठे बंधू पै.निजामभाई सय्यद यांची निरस्वार्थीपणे लोक उपयोगी सेवा ही राजकीय कारकिर्दीची आठवण देत, आज देखील त्यांची ती राजकीय कारकिर्दी लोकांच्या स्मरणात आहे. लोकनेते म्हणून त्यांची लोकांसमोर आज देखील ओळख आहे. त्याच पद्धतीत याकूब सय्यद हे देखील पत्रकार क्षेत्रात कार्य करीत असून, लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत. सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्राचा तसेच शासकीय प्रशासकीय कार्यालयाचा चांगला अनुभव त्यांना आहे नागोठणे पंचक्रोशीमध्ये सय्यद यांची सामाजिक कारकिर्दी गाजत आहे.
सामाजिक कार्यकर्ते याकूब सय्यद यांनी मोहल्ल्यातील कार्यकर्त्यांना आपल्याबरोबर घेऊन शिवसेना पक्षात सर्वप्रथम प्रवेश करून मोहल्यात शिवसेना पक्षाची स्थापना केली आहे. तसेच नागोठणे मोहल्यात राजकीय इतिहासाची नांदी रचली आहे. असे शेवटी राज वैशंपायन यांनी सांगितले.या कार्यक्रमाला असंख्य नागरिक तसेच शिवसैनिक उपस्थित होते
Comments
Post a Comment