Posts

Showing posts from April, 2025
Image
  सर्व कार्यालयांनी सातकलमी कृती  कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करावी पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर अकोला : प्रतिनिधी :- शासनाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमात कार्यालयांनी केलेल्या अंमलबजावणीचे परीक्षण ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’कडून होणार आहे. या कार्यक्रमाचे महत्व व गांभीर्य लक्षात घेऊन सर्व कार्यालयांनी तत्काळ आवश्यक त्रुटींची पूर्तता करून परिपूर्ण अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे दिले. शासनाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमात कार्यालयांच्या अंमलबजावणीचा आढावा पालकमंत्र्यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, तसेच सर्व विभागप्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. फुंडकर म्हणाले की, सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (इज ऑफ लिव्हिंग) यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. अद्ययावत संकेतस्थळ,  सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारीचे निव...
Image
  अधिकाऱ्यांनी कार्यालयाचे दार उघडे ठेवावे – निरंजनकुमार सुधांशू राज्‍यसेवेतील १४४ अधिकाऱ्यांचे यशदामध्ये पायाभूत प्रशिक्षण पुणे : प्रतिनिधी : - शासकीय अधिकाऱ्यांकडे काम घेऊन येणाऱ्यांसाठी त्‍या अधिकाऱ्यांनी उपलब्‍ध असले पाहिजे. त्‍याचबरोबर लोकांमध्ये जाऊन त्‍यांच्या समस्‍या जाणून घेऊन त्‍यांच्या सूचना विचारात घेऊन त्‍या पद्धतीने कामकाज करायला हवे. त्‍याचबरोबर अधिकाऱ्यांनी आपल्‍या कार्यालयाचे दार सामान्यांसाठी सतत उघडे ठेवावे, असे आवाहन यशदाचे महासंचालक निरंजनकुमार सुधांशू यांनी केले. महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाकडून नियुक्‍त झालेल्‍या राज्‍यसेवेतील वर्ग -१ च्या १४४ अधिकाऱ्यांच्या १० व्या एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) तुकडीचे पायाभूत प्रशिक्षण आजपासून यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदामध्ये सुरु झाले. या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी सुधांशू बोलत होते. राज्‍याच्या सामान्य प्रशासन विभागाने महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्‍यसेवा परीक्षेतून सरळसेवेने नियुक्‍त होणाऱ्या गट ‘अ’ व गट ‘ब’ मधील अधिकाऱ्यांसाठी एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम  (स...
Image
  आंबा फळांचा जाहिर लिलाव इच्छुक संस्था - व्यक्तीनी सहभाग घ्यावा   रायगड : प्रतिनिधी :- तालुका फळरोपवाटीका आवास ता.अलिबाग या शासकीय फळरोपवाटीकेतील 110 आंबा मातृवृक्षावरील आंबा फळांचा जाहिर लिलाव बोली पध्दतीने मंगळवार दि.16 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता आयोजीत करण्यात आली असून इच्छुक संस्था/व्यक्तीनी लिलावाच्या दिवशी शासकीय फळरोपवाटीकवर हजर रहावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांनी  केले आहे. तसेच फळबागतील फळ लिलाव संबंधी अटी व शर्ती व शासकीय निर्धारीत रक्कम तालुका फळरोपवाटीका आवास ता. अलिबाग या शासकीय फळरोपवाटीकेच्या कार्यालयात शासकीय सुट्टीचा दिवस वगळून दि.03 एप्रिल 2025 रोजी पासून पहावयास मिळतील. लिलावात वाजवी दर नाही मिळाले तर पुढे वाढीव मुदत देणे / लिलाव रद्द करणे किंवा अंतिम निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार निम्न स्वाक्षरीत यांनी राखून ठेवले आहेत.
Image
  100 दिवस सात कृती कलमी आराखडा उपक्रमात नागपूर जिल्ह्यात तब्बल 45 हजार 647 दाखल्यांचे वाटप जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर  जिल्ह्यात आजवर 93 शिबिरे आयोजित नागपूर : प्रतिनिधी : - सर्वसामान्यांना शासनाशी निगडीत असलेली विविध कामे विनासायास व्हावेत व प्रशासनात सुकर जीवनमानासह स्वच्छता, जनतेच्या तक्रारीचे निवारण आदी महत्वपूर्ण 7 उद्दिष्टाची निश्चिती करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात 100 दिवसांचा कृती आराखडा हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत नागपूर जिल्ह्यात आजवर 93 ठिकाणी शिबिरांचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना तब्बल 45 हजार 647 दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या दाखल्यांमध्ये जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, रहिवासी, आधार नोंदणी व उत्पन्नाचे दाखले यांचा समावेश आहे.  जिल्हा प्रशासनाअंतर्गत हा उपक्रम ग्रामीण भागापर्यंत अत्यंत सक्षमतेने पार पडावा, शासनाप्रती सर्वसामान्यांच्या मनात विश्वास वाढावा यादृष्टीने हा उपक्रम अत्यंत लाख मोलाचा असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्...
Image
  पिंप्री राजा येथे कन्या दिन उत्साहात साजरा मुलींच्या जन्माचे स्वागत करा-जिल्हाधिकारी स्वामी छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी :-  पिंप्री राजा ग्रामपंचायत येथे कन्या दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक मुलीच्या जन्माचे स्वागत करा आणि बाल विवाहाला विरोध करा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना केले.  मुलींच्या जन्मदराचे प्रमाण संतुलित राहावे आणि बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशानेजिल्हा प्रशासनाच्या वतीने मराठी नव वर्षाचे औचित्य साधून जिल्हाभरात हा उपक्रमप्रत्येक ग्रामपंचायतीत राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन पिंप्री राजा ग्रामपंचायत आवारात करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, सरपंच श्रीमती वैशाली पवार, उपसरपंच मोहसीन सय्यद, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, गटविकास अधिकारी मीना रावताळे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सावरगावकर, तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ता...