100 दिवस सात कृती कलमी आराखडा उपक्रमात नागपूर जिल्ह्यात तब्बल 45 हजार 647 दाखल्यांचे वाटप
जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर
जिल्ह्यात आजवर 93 शिबिरे आयोजित
नागपूर : प्रतिनिधी : - सर्वसामान्यांना शासनाशी निगडीत असलेली विविध कामे विनासायास व्हावेत व प्रशासनात सुकर जीवनमानासह स्वच्छता, जनतेच्या तक्रारीचे निवारण आदी महत्वपूर्ण 7 उद्दिष्टाची निश्चिती करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात 100 दिवसांचा कृती आराखडा हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत नागपूर जिल्ह्यात आजवर 93 ठिकाणी शिबिरांचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना तब्बल 45 हजार 647 दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या दाखल्यांमध्ये जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, रहिवासी, आधार नोंदणी व उत्पन्नाचे दाखले यांचा समावेश आहे.
जिल्हा प्रशासनाअंतर्गत हा उपक्रम ग्रामीण भागापर्यंत अत्यंत सक्षमतेने पार पडावा, शासनाप्रती सर्वसामान्यांच्या मनात विश्वास वाढावा यादृष्टीने हा उपक्रम अत्यंत लाख मोलाचा असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व घटकांपर्यंत पोहचण्याचा आमचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा प्रशासनातील सर्व टीम परस्पर सहयोगातून हा उपक्रम अधिक भक्कम करुन दाखवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment