आंबा फळांचा जाहिर लिलाव
इच्छुक संस्था - व्यक्तीनी सहभाग घ्यावा
रायगड : प्रतिनिधी :- तालुका फळरोपवाटीका आवास ता.अलिबाग या शासकीय फळरोपवाटीकेतील 110 आंबा मातृवृक्षावरील आंबा फळांचा जाहिर लिलाव बोली पध्दतीने मंगळवार दि.16 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता आयोजीत करण्यात आली असून इच्छुक संस्था/व्यक्तीनी लिलावाच्या दिवशी शासकीय फळरोपवाटीकवर हजर रहावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांनी केले आहे.
तसेच फळबागतील फळ लिलाव संबंधी अटी व शर्ती व शासकीय निर्धारीत रक्कम तालुका फळरोपवाटीका आवास ता. अलिबाग या शासकीय फळरोपवाटीकेच्या कार्यालयात शासकीय सुट्टीचा दिवस वगळून दि.03 एप्रिल 2025 रोजी पासून पहावयास मिळतील. लिलावात वाजवी दर नाही मिळाले तर पुढे वाढीव मुदत देणे / लिलाव रद्द करणे किंवा अंतिम निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार निम्न स्वाक्षरीत यांनी राखून ठेवले आहेत.
Comments
Post a Comment